Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांनी केली आपल्याच सहकार्याची हत्या

पोलीस खबरी असल्याचा संशय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 09 नोव्हेंबर :-  पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी सोमवारी रात्री आपल्या एका सहकार्यांची गोळी घालून हत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा गावासमीप घडली. दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी (26) असे मृत नक्षलवाद्यांचे नाव असून तो एटापल्ली तालुक्यातील झुरी गाव का रहिवासी आहे.

अधिक माहितीनुसार, सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी दिलीप हिचामीला गर्देवाडा गावाजवळच्या रस्त्यावर गोळी झाडून ठार केले. मंगळवारी सकाही त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी ठेवली असून त्यामध्ये दिलीप हिचामी हा पोलिसांचा खबरी असल्याने त्याची हत्या केल्याचे म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

2011 मध्ये दिलीप हिचामी नक्षल दलममध्ये सहभागी झाला होता. 2012 मध्ये तो कसनसूर एलओएसचा पूर्णवेळ सदस्य म्हणून काम पाहत होता. सप्टेंबर 2022 पर्यंत तो दलममध्ये विविध जबाबदार्या पार पाडत होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिलीपने पोलिसांशी संपर्क ठेवत शंकरराव नामक नक्षलवाद्यांची विभागीय समिती सदस्यांची हत्या केली. ही हत्या चकमकीत झाल्याचा देखावा दिलीप ने केला होता. तो पोलीस खबरी असल्याचे समजल्यानंतर त्याची हत्या करीत असल्याचे मृतदेहावर टाकलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.