Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संजय राउत यांना जामीन मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 09 नोव्हेंबर :- ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राउत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीने कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राउत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै ला ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राउत यांनी सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राउत ऑर्थर रोड कारागृहात होते. पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राउत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरून करण्यात आला आहे. संजय राउत यांचे भाउ प्रविण राउत पत्रा चाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुप कडून 112 कोटी रूपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रूपये संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैसातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राउत परिवाराला पत्रा चाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरूवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती. ते प्रविण राउत हे फक्त नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राउतच आहेत असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच संजय राउतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.