Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

न्यायमुर्ती डी.वाय. चंद्रचूड बनले देशाचे 50 वे सरन्यायाधीश

राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर :-  सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमुर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांनी बुधवार 9 नोव्हेंबर रोजी भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात देशाचे 50 वे सरन्यायाधीश न्यायमुर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. न्यायमुर्ती चंद्रपूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षासाठी या पदावर असतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच 65 व्या वर्षी निवृत्त होतात. 11 ऑक्टोबर रोजी न्यायमुर्ती उदय उमेश ललित यांनी त्यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची 17 ऑक्टोबर रोजी पुढील सीजीआय म्हणून नियुक्ती केली.

न्यायमुर्ती चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला आणि 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची उन्नती झाली होती. न्यायमुर्ती चंद्रचूड हे अनेक घटनापीठ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा भाग आहेत. ज्यांनी ऐतिहासिक निकाल दिले आहेत. यामध्ये अयोध्या जमीन वाद, आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, सबरीमाला प्रकरण, लष्करातील महिला अधिकार्यांना कायमस्वरूपी कमिशन देणे, भारतीय नौदलातील महिला अधिकार्यांना कायमस्वरूपी कमिशन देणे आदिंचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

न्यायमुर्ती चंद्रचूड हे 29 मार्च 2000 ते 31 ऑक्टोबर 2013 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमुर्ती चंद्रचूड यांना जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त साॅलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी राष्ट्रीय राजधानीतील सेंट स्टीफन्स काॅलेजमधून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स, दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लाॅ सेंटरमधून एलएलबी आणि हार्वर्ड लाॅ स्कूल, युएसएम मधून एलएलएम आणि फाॅरेन्सिक सायन्स मध्ये डाॅक्टरेट केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.