Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांचा पिएलजिए सप्ताह आजपासून.

नक्षलग्रस्त दुर्गम भागातील नागरिकांत दहशतीचे वातावरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. २ डिसेंबर:- नक्षल्यांनी आज 2 डिसेंबर पासून पिएलजिए या सप्ताहाचे आयोजन केले असून दुर्गम भागात आवाहन करणारी पत्रके टाकण्यात आली आहेत. त्यामुळे नक्षलग्रस्त दुर्गम भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पिएलजिए या सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे. एटापल्लीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जीवनगट्टा या गावातील मुख्य रस्त्यावर रविवारी मध्यरात्री दरम्यान नक्षल्यांनी पत्रके टाकून आज 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान या सप्ताह साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी (पिएलजिए) नावाची जहाल नक्षली संघटना आहे. या सप्ताहमध्ये ग्रामीण भागातील युवक व युवतींना सामील करून घेतात त्यांच्याकडून हिंसक कारवाई करण्यासाठी तसेच संघटनेत सामील करून शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षणही पिएलजिए संघटनेकडून दिले जाते. ब्राह्मणवादी, दलाल, भांडवलदारांकडून देश मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींना पिएलजिए संघटनेत सामील व्हावे. जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी सरकारी हल्ल्याचा विरोध करावा, मोदी सरकारचा दडपशाहीच्या विरोधात संघटित लढा उभारा असा मजकूर पत्रकात लिहिण्यात आलेला आहे. पिएलजिए सप्ताहामुळे दुर्गम भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Comments are closed.