पर्यटकांच्या वाहनाला अपघात.
दोन मृत,पाच जखमी कोलरा गेट, तुकुम जवळील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. १ डिसेंबर: वाघाच्या दर्शनासाठी हमखास प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मधील कोलरा गेट येथे फोर्ड एम एच ४९ बिके -२४८९
या वाहनाने सफारीसाठी जात असताना चिमूर कोलरा गेट दरम्यान भडगा नाल्या जवळील वळणावर गाडी अनियंत्रित झाल्याने महिला चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे गाडी नाल्यात जाऊन उलटली. यामध्ये एक तेरा वर्षाची मुलगी सना अभिषेक अग्रवाल या बलिकेचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अनिमेश अग्रवाल ४० वर्ष याना नागपूरला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला तर चार पर्यटक जखमी झाले सदर घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजता दरम्यान तुकुम जवळील भडगा नाल्याजवळ घडली.
नागपूर येथील अग्रवाल परिवारातील सदस्य ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मधील कोलरा गेट मधून सफारी साठी वन्य विलास रिसॉर्ट येथे जाण्यासाठी सकाळी आपल्या MH49- 2489 व CG-04 LS0001 क्रमांकाच्या वाहनाने सकाळी निघाले दरम्यान चिमूर येथे गाडीत डीझल भरून दोन्ही गाड्या चिमूर वरून कोलरा साठी निघाल्या अपघात ग्रस्त गाडीचे चालक यांना बाजूला करून निशा गोयल या गाडी चालवीत असता तुकुम पुढील भडगा नाल्या जवळील वळणावर गाडी अनियंत्रित झाली त्यामुळे गाडी रोड लगत नाल्यात गेली व पलटली यामध्ये सना अभिषेक अग्रवाल वय १३ वर्ष या बलिकेचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला तर अनिमेश अशोक अग्रवाल ४० वर्ष, मिनू अनिमेश अग्रवाल, ३२ वर्ष, नेहा आशिष अग्रवाल ३६ वर्ष, इशू अनिमेश अग्रवाल १७ वर्षे, निशा अग्रवाल ४० वर्षे राहणार सर्व नागपूर या जखमींना उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना अनिमेश अशोक अग्रवाल ४० वर्ष यांचा वाटेत मृत्यू झाला
अपघाताची माहिती मिळताच चिमूर पोलीस व परिसरातील नागरिकांनी पलटलेली फोर्ड गाडी ट्रॅक्टर ने सरळ करून जखमींना बाहेर काढले व चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्व जखमींना नागपूर येथील शुवरटेक रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले.
चिमूरचे ठाणेदार रविंद्र शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड,विलास निमगडे, कैलाश आलम, रोशन तामशेट्टीवर घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत. उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना अनिमेश अशोक अग्रवाल 40 वर्षे याचा वाटेत मृत्यू झाला आहे.
दुपारी तीन वाजताची होती सफारी
सकाळी नागपूर वरून निघालेल्या अग्रवाल परिवाराचा कोलरा येथील वन्य विलास रिसॉर्ट मध्ये थांबणार होते त्यानंतर दुपारी तीन वाजता कोलरा गेट मधून ताडोबात प्रवेश करून ताडोबाच्या सौंदर्याचा आनंद घेणार होते मात्र त्या आधीच काळने घाला घातला व त्याची सफारी अधुरी राहिली.
गाडी चालक बदलावल्यानेच संकट ?
अग्रवाल परिवार रेंज रोव्हर CG-04-LS-1 आणि फोर्ड MH 49 BK-24 89 या वाहनाने कोलरा येथे पर्यटनासाठी जात होते चिमूर येथे गाडीत इंधन भरल्यानंतर अपघात ग्रस्त गाडीचे चालक दुसऱ्या गादीवर ड्रायव्हिंग करीत होते तर अपघात ग्रस्त गाडी निशा अग्रवाल चालवीत होत्या माञ काही किलोमीटर अंतरावर जाऊन गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला अगर चालक बदलावला नसता तर कदाचित घटना टळली असती.
Comments are closed.