Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना ‘कोरोना’ची लागण.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क:- नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. “माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे”, अशी माहिती रोहिणी खडसे यांनी ट्विटर दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना तिकीट नाकारल्यानंतर भाजपकडून रोहिणी खडसेंना मुक्ताईनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, रोहिणी खडसे या जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय असून नुकताच एकनाथ खडसे यांच्यासह त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.