Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

NEET- नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून नीट युजी निकाल जाहीर

तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती 99.99 टक्क्यांसह देशात प्रथम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

14 जून,  NEET UG Result 2023 – नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून नीट युजी 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा  वरुण चक्रवर्ती 99.99 टक्क्यांसह देशात प्रथम तर राज्यात श्रीनिकेत रवीनं पहिला क्रमांक  पटकावला. NEET परीक्षेच्या निकाल रात्री उशिरापर्यंत अकरा वाजता लागला.

देशभरातून 20 38596 विद्यार्थ्यांनी  ही परीक्षा दिली होती. त्यातील 1145976 विद्यार्थी हे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्याचे 1,39,961 विद्यार्थी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहे त्यानंतर महाराष्ट्रचे 1,31,008 विद्यार्थी आणि राजस्थान राज्यातील 1,00,316 विद्यार्थी हे सर्वाधिक पात्र ठरले आहे. पुढील प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 720 पैकी 137 गुण (50 परसेन्टाईल ) आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी ,एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना 720 पैकी 107 गुण (40 परसेन्टाईल )आवश्यक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

श्रीनिकेतनसह राज्यातील तनिष्क देवेंद्र भगत (AIR 27) आणि रिद्धी वजारिनकर ( AIR 44)  या दोन विद्यार्थ्यांनी टॉप 50 मध्ये स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राची उत्तीर्णांची टक्केवारी 47.84% आहे. महाराष्ट्रचे 1,31,008 विद्यार्थी आणि राजस्थान राज्यातील 1,00,316 विद्यार्थी हे सर्वाधिक पात्र ठरले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सलोनी गौतम या विद्यार्थिनीने आपलं आयुष्य संपवलं आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिने पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. NEET परीक्षेच्या निकाल रात्री उशिरापर्यंत अकरा वाजता लागला घरातील सर्व झोपी गेले होते. नीट परीक्षेत सलोनीला कमी मार्क मिळाले त्यामुळे नैराश येऊन तिने रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली.च्च स्तरीय तपासणी साठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेण्यात आलं असून या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.

हे पण वाचा :-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.