Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे लग्न नाही – केरळ उच्च न्यायालय

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

तिरुवनन्तपुरम, 14 जून – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांबाबत केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या संबंधांना विवाह म्हणून मान्यता देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपला विवाह म्हणून मान्यता देणारा असा कोणताही कायदा बनवण्यात आलेला नाही. जर दोन व्यक्ती केवळ एकमेकांच्या संमतीच्या आधारावर एकत्र राहत असतील तर याचा अर्थ ते विवाह कायद्याच्या कक्षेत येतात असे नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती मुहम्मद मुश्ताक आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने सांगितले की, अशा जोडप्यांचे सहवास हे लग्न ठरत नाही आणि त्यात घटस्फोटही मागता येत नाही. याचिकाकर्त्या दाम्पत्यामध्ये एक हिंदू आणि दुसरा ख्रिश्चन आहे. 2006 मध्ये या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. कालांतराने या दोघांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र आता या दोघांना एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे. ज्यामुळे त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. कौटुंबिक न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाने म्हटले होते की, जोडप्याने कोणत्याही कायद्यानुसार लग्न केलेले नाही. अशा परिस्थितीत ते घटस्फोटाची मागणी करू शकत नाहीत. कौटुंबिक न्यायालयात निराशा हाती लागल्याने हे जोडपं केरळ उच्च न्यायालयात पोहोचलं होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.