पुलखल येथील नवनियुक्त सरपंच व ग्रा.पं सदस्यांचे खा. अशोक नेते यांच्याकडून अभिनंदन
गडचिरोली, दि. 18 फेब्रुवारी: गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर जयश्री दीपक कनाके व उपसरपंच रुमनबाई रवींद्र ठाकरे यांची निवड झाली तर सदस्य म्हणून खुशाब पाटील ठाकरे, प्रवीण कनाके यांची निवड झाली. या सर्वांचे खासदार अशोक नेते यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी ग्रामस्थ सुरेश भगत,आनंदराव पा ठाकरे, लंकेश तांगडे, पुरुषोत्तम रोळे, दीपक रोळे, दीपक कनाके,प्रमोद रेचनकर,रवींद्र ठाकरे,नतन गेडाम, प्रशांत कोटगले, निलेश ठाकरे, पुरंदर गेडाम, सर्व पुलखल ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed.