Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकी करिता अधिसूचना प्रसिद्ध.

Get real time updates directly on you device, subscribe now.

नागरिकांनी हरकती दिनांक 18 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सादर कराव्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि.17 नोव्हेंबर: जिल्हयातील धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी , भामरागड व सिरोंचा या नगर पंचायतीच्या सन 2020 मध्ये होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणूकासाठी नगर पंचयात क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती नागरिकांचे मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे त्यामधील स्त्रियांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करण्याचे ठरवीत आहे. याबाबतची अधिसूचना व आदेशाचा मसुदा जनतेच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुचना फलकावर तसेच सर्व नगर पंचायत व तहसिल कार्यालयाच्या सुचना फलकावर दिनांक 18 नोव्हेंबर, 2020 (बुधवार) रोजी प्रसिध्दी करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हि अधिसुचना जिल्ह्यातील नगर पंचायत , धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी, भामरागड, व सिरोंचा क्षेत्रातील सर्व रहीवाश्यांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत असून आदेशाच्या मसुद्यावर दिनांक 18 नोव्हेंबर, 2020 (बुधवार) ते 26 नोव्हेबर, 2020 (गुरुवार) पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती व सुचना मागविण्यात येत आहेत. उक्त आदेशाच्या मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती / सुचना असतील त्यांनी त्या पुराव्यासह संबधित उप जिल्हाधिकारी / उप विभागीय अधिकारी / मुख्याधिकारी यांचेकडे दिनांक 26 नोव्हेंबर, 2020 (गुरुवार) रोजी किंवा तत्पुर्वी कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती / सुचना विचारात घेण्यात येणार नाही. विहीत कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी दिनांक 10 डिसेंबर, 2020 पर्यंत घेण्यात येईल. यांची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.