शिर्डीत साईंच्या चरणी ६६० ग्रॅम वजनाचे सुवर्ण ताट अर्पण..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
शिर्डी : देश-विदेशातील लाखो भक्तांची अपार श्रद्धा असलेल्या शिर्डी साईबाबांवर भक्तीच्या भावनेतून सतत विविध स्वरूपात देणगी अर्पण होत असते. आज ठाणे येथील हिर रिअल्टी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे धरम कटारिया यांनी साईबाबांच्या चरणी ६६० ग्रॅम वजनाचे आकर्षक सुवर्ण ताट अर्पण केले.
या ताटाची किंमत तब्बल ७४ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. देणगीचे स्वाधीन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
सुवर्ण ताट अर्पण झाल्यानंतर संस्थानच्या वतीने गाडीलकर यांनी धरम कटारियांचा सत्कार केला आणि त्यांच्या देणगीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या भावनाप्रधान समारंभात उपस्थित भक्तांनीही या पवित्र क्षणाचे दर्शन घेऊन श्रद्धा व्यक्त केली.
साईबाबांच्या चरणी देणगी अर्पण हा केवळ भक्तीचाच नव्हे, तर सामाजिक दायित्व आणि श्रद्धेची साक्षी आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.