Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठ मध्ये प्राध्यापकांच्या मुलाखतीत मान्यवर दीड तास उशीर

मुलाखती साठी आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली नाराजगीं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १५ डिसेंबर :- सध्या देशभरत कोरोना महामारीने ग्रासले असल्याने मुलाखतीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमाचे पालन करून योग्य वेळेवर उपस्थित राहून सामाजिक अंतर ठेवून, मास्क लावून येणे गरजेचे होते, गोंडवाना विद्यापीठाच्या सुचनेचे पालन करून तासिका बेस वर निघालेल्या जागांसाठी मुलाखती देण्याकरिता विद्यार्थी सभागृहात जमा झाले. दीड तासापेक्षा जास्त वेळ होत असून विद्यार्थी दूरदूरून आलेले असून विद्यापीठाच्या कुलगुरूवर नाराजगीं व्यक्त करीत आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुर्ण असलेल्यासाठी सहाय्यक प्राध्यापक च्या विविध विषयांच्या जागा तासिके नुसार काढण्यात आले आहे, त्यामुळे रसायनशास्त्र चे 6 जागे, एम.बी.ए चे 3 जागे, मास कॅमुनिकेशन चे 2 जागे आणि भौतिकशास्त्र चे 4 असे एकूण 15 जागेसाठी मुलाखती घेण्यात 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येणार असल्याचे नोटीस मध्ये जाहीर केले.
नोटीस पत्र बघून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी सारख्या अतिदुर्गम क्षेत्रातील विध्यार्थी वेळेचे नियोजन ठेऊन सकाळी येऊन मुलाखतीला जाण्यासाठी तयार झाले आहेत, मात्र मुलाखती घेण्यासाठी येत असलेल्या कुलगुरु, अधिकारी, तसेच इतर मान्यवर जवळपास दीड तासापेक्षा जास्तवेळ होत असून सुद्धा मुलाखती साठी उपस्थित नसल्याने दूरदूरून आलेल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.