Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समतादुत प्रकल्प बार्टीच्या वतीने ऑनलाईन बुद्ध जयंती साजरी

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २७ मे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे जिल्हा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना एकत्र येऊन कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने झुम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांच्या मार्गदर्शनात समतादूत वर्षा कारेंगुलवार यांनी सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले या विषयावर सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. सुधीर वानखडे सद् धम्म प्रचारक अमरावती हे लाभले होते तर अध्यक्ष म्हणून प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर उपस्थित होते, मा. सुधीर वानखडे सर यांनी तथागत गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले या विषयावर उदाहरण देऊन अत्यंत समर्पक असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकला त्यात त्यांनी बुद्ध धम्म कसा स्थापन केला व त्याचा प्रसार प्रचार करून जगात  बुद्ध  धम्माची शिकवण दिली व  जगाला शांतीचा संदेश व पंचशील दिले,बुद्ध हे मोक्षदाता नसून मार्गदाता आहेत असे आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमात चंद्रपूर तसेच गडचिरोली  जिल्ह्यातील समतादुत, नागरीक तसेच इतर जिल्ह्यातील सुद्धा नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन  समतादूत वर्षा  कारेंगुलवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रज्जूताई मेंधुळकर यांनी केले कार्यक्रमात   अध्यक्ष , मार्गदर्शक व उपस्थित नागरीक यांचे आभार कृपाली धरणे समतादूत यांनी केले ,कार्यक्रमाच्या यशस्वीपणे राबविण्यासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील समतादूत यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

 

 

 

Comments are closed.