Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“कुणा ऐऱ्या-गैऱ्याचं काम नव्हे,” अवघ्या चार वर्षीय चिमुरड्याने केला कलावंतीण दुर्ग सर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. १७ मार्च: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक आसरोटी येथील चार वर्षीय चिमुरड्याने सह्याद्रीचा अंत्यत थरारक व ट्रेकर्सच्या दृष्टीने अंत्यत कठीण व अवघड समजला जाणारा कलावंतीण दुर्गचा गगनचुंबी सुळका अवघ्या २५ मिनिटांत सर करून अनोखा विक्रम केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोमवार दि. १५ मार्च २०२१ रोजी देवेन उर्फ श्री या चिमुरड्यांने केलेल्या धाडसी कामगिरीची खालापूर परिसरातच नव्हे राज्यभरातील ट्रेकर्स, क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे.  खालापूर तालुक्यातील चौक आसरोटी गावातील चिमुरड्या देवेन रोहिदास ठोंबरे याला वयाच्या अकराव्या महिन्यांपासूनच ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. या आवडीतूनच त्याने गडकिल्ले सर करण्याचा सपाटा लावला आहे.

आतापर्यंत त्याने रायगड,शिवनेरी, सुधागड,लोहगड,विसापूर,माणिकगड,सोंडाई दुर्ग,गणपती घाटातील पदरगड आणि आता नुकताच कलावंतीण दुर्ग सर केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अडीच हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणारा सोसाट्याचा वारा. असा अनेक अंगांनी आव्हानात्मक असणारा हा कलावंतीण दुर्ग चा सुळका गिर्यारोहकांना रॅपलिंगद्वारे सर करावा लागतो. त्यामुळेच हा किल्ला सर करणं कुणा ऐऱ्या-गैऱ्याचं काम नव्हे, पण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका येथील आसरोटी मधील चार वर्षीय चिमुरडया देवेन रोहिदास ठोंबरे ने तो सर केला आहे. गडकिल्ले हा आपला रक्तरंजित ठसा आहे आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत हे जगाला दाखवून दिलं आहे.

देवेनच्या अनोख्या ट्रेकची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोमवारी हा ट्रेक यशस्वी झाल्याने देवेनचा सर्वांत लहान ट्रेकर अशीही नोंद होईल, असा विश्वासही रोहिदास ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.

“गडकिल्ल्यांचे संवर्धन प्रत्येकानेच केले पाहिजे हा संदेश समाजात देण्यासाठी कलावंतीण मोहीम देवेन ला घेऊन फत्ते केल्याचे” देवेनचे वडील तथा शिवकार्य ट्रेकर्स खालापूरचे संस्थापक रोहिदास ठोंबरे यांनी सांगितले.

       आज महाराष्ट्रातील अनेक दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने गडकिल्ल्यांचे संवर्धन केले जाते. नुकतेच कलावंतीण दुर्ग वर राजे प्रतिष्ठान यांचे दुर्गसंवर्धन कार्य सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी देवेन ला त्याचे वडील रोहिदास ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याची आई रसिका ठोंबरे यांचे विशेष सहकार्य लाभले.    

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.