Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 24, डिसेंबर :-  गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24/12/2022 रोजी “भव्य रोजगार मेळावा” पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पाडण्यात आला.

या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील 140 बेरोजगार युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सहभागी झाले होते, यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर यांचे मार्फत 140 नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व युवतींना नियुक्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. यावेळी नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे मा. पोलीस अधीक्षक  नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील. तसेच येणा­या सन 2023 या नवीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे दुर्गम अतिदुर्गम भागातील युवक-युवतींसाठी 10,000 नवीन रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे. आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून द्यावे व त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे जीवनमान उंचवावे. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 512, नर्सिंग असिस्टंट 1143, हॉस्पीटॅलिटी 314, ऑटोमोबाईल 276, इलेक्ट्रीशिअन 167, प्लंम्बींग 35, वेल्डींग 38, जनरल डयुटी असिस्टंट 314, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई 52 असे एकुण 2,977 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 140, कुक्कुटपालन 531, बदक पालन 100, शेळीपालन 80, शिवणकला 242, मधुमक्षिका पालन 53, फोटोग्राफी 65, भाजीपाला लागवड 1395, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 1062, टु व्हिलर दुरुस्ती 64, मत्स्यपालन 87, फास्ट फुड 65, पापड लोणचे 59, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 502, एमएससीआयटी 200, कराटे प्रशिक्षण 48 असे एकुण 4741 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर भव्य रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी  यतिश देशमुख सा., तसेच  नितीन सेन गुप्ता, सेंटर हेड व हेमंत बन्सोड, पार्कसन्स स्किल इन्स्टीट्युट, नागपूर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे व पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.