Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर दि. 09 डिसेंबर: राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये पालघर जिल्हयासह राज्यातील विविध खाजगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरणार आहेत.
अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये पालघर जिल्हयासह राज्यातील विविध उद्योग व व्यवसायांना नववी उत्तीर्ण पासून दहावी, बारावी, आय टी आय, पदविधर, डिप्लोमा तसेच बी. ई. आणिइतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक युवक-युवतींनी दिनांक 13 डिसेंबर 2020 पर्यत पसंतीक्रम नोंदवुन या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

अशी करा ऑनलाईन नोंदणी :
हा रोजगार मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच आहे. पालघर जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in. होमपेजवरील जॉब सीकर (Job Seekar) लॉगिनमधून युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्लिक करून प्रथम मुंबई विभाग व त्यानंतर पालघर जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी. आवश्यक पात्रतेनुसार ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम नोंदवून मेळाव्यात सहभागी होता येईल.
मुलाखतीबाबत कळविणार :
उमेदवारांना पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दुरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.