Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबितांच्या निवृत्ती वेतन समस्या सोडविण्यासाठी आऊटरीच प्रोग्राम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 24:- जिल्ह्यातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व पेन्शनधारक अवलंबितांच्या निवृत्तीवेतन विषयी समस्यांचे निवारण करण्यासाठी आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत डीपीडीओ सिकंदराबाद, हैद्राबाद, चेन्नई, विशाखापटणम व गार्डस रिकॉर्ड ऑफिस कामठी येथून विशेष टिम आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी कर्नल विकास वर्मा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व जास्तीत जास्त माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व पेन्शनधारक अवलंबितांनी स्पर्श आऊटरीच प्रोग्रामचा लाभ घ्यावा असे सांगितले. सैनिकांच्या त्यागाची परतफेड होऊच शकत नाही, असे सांगत त्यांनी सैनिकांना कुठल्याही कार्यालयीन कामात तात्काळ मदत करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या सुचना दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कैप्टन दिपक लिमसे, यांनी प्रास्ताविकात स्पर्श आऊरिच प्रोग्रामचे महत्व सांगितले. सैनिकांचे पेंशन विषयक लाभ त्यांना त्वरीत प्राप्त करून देण्यात येईल. तसेच माजी सैनिकांना त्यांच्या पेंशनची इत्यभुंत माहिती तात्काळ उपलब्ध होइल, असे सांगितले. मेजर कुलदिप सिंग, गार्डस रिकॉर्ड ऑफिस कामठी यांनी सुध्दा स्पर्श प्रोग्राम बद्दल माहिती सांगून निवृत्तीवेतन धारकांना महत्व पटवून सांगितले.
कर्नल विकास वर्मा यांनी उपस्थित सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व पेन्शनधारक अवलंबित यांच्या निवृत्ती वेतन विषयी समस्या जाणून घेऊन सर्व समस्यांचे निवारण लवकर करण्याचे आश्वासन दिले.

 

Comments are closed.