Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात वार्षिक उत्सव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 24 एप्रिल : 20 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्पोर्ट्स अँड कल्चर मीठ अंतर्गत प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर गीत, रनिंग, गोळा फेक, वक्तृत्व स्पर्धा घेवून वार्षिक उत्सव साजरा करण्यात आला.उत्सवातील विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक व यशस्वीतेचा सत्कार करण्याकरिता बक्षीस वितरण समारंभ दि. 24 येप्रीलला घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क प्राचार्य डॉ. एम के मंडल होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयीन प्रा.रमेश हलामी, प्रा. मदन शिरभैये, प्रा. अतुल खोब्रागडे, प्रा. शामल विश्वास, प्रा.डॉ. सुनंदा पाल , प्रा. उदय सरमोकदम, प्रा. कांचन दुर्वे प्रा. सुनील खंडाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.तानाजी मोरे तर आभार प्रदर्शन डॉ. सुनंदा पाल यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.