Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली शहरातील फुले वार्डातील पक्षी नष्ट करताना बाहेरील नागरिक, पत्रकारांनी प्रवेश करु नये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 20 जानेवारी: गडचिरोली शहरातील फुले वार्डात बर्ड फ्ल्यु संसर्गामुळे संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून त्या ठिकाणी संक्रमित पक्षी व 1 किमी. त्रिज्येतील कुक्कुटपालनातील पक्षी यांना नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्या ठिकाणी बाहेरील नागरीक तसेच पत्रकार यांना उपस्थित राहु नये म्हणून आवाहन करण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणी छायाचित्र, व्हीडीओ घेणेसाठी मज्जावही करण्यात आला आहे. संसर्ग रोखण्यासाठी व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खबरदारीची उपाययोजना म्हणून सदर आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.