जालन्यातील साष्टेपिंपळगावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मिरवणुक व ठिय्या आंदोलन
मराठा आरक्षण मिळेपर्यंत 25 तारखेपासून आमरण उपोषणाचा ईशारा
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. २० जानेवारी: सर्वोच्च न्यायालयात आजपासून एकीकडे मराठा आरक्षणावरील अंतिम सुनावणी सुरू झाली असली तरी दुसरीकडे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असणाऱ्या साष्टेपिंपळगावात संपूर्ण गाव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय. सुमारे 5 हजारावर सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ आबालवृद्ध महिलांसह मिरवणुकीत सहभागी झालेत. बैलगाड्या, ट्रॅक्टर, मोटारसायकल, लेझीम पथक, बँड पथकासह महिला, मुलीचा या मिरवणुकीत समावेश आहे. एक मराठा लाख मराठा,एकच मिशन मराठा आरक्षण, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणांनी आसमंत दणाणून सोडलय. या विशाल मिरवणुकीचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले.
याठिकाणी 9 शिवकन्यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना करण्यात आली. या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हजर झालेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत 25 तारखेपासून अनेक कार्यकर्ते याठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत.
Comments are closed.