Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 26 जून – महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत प्रती वर्षी इमाव व विजाभज प्रवर्गातील 50 विद्यार्थ्याना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. राज्य शासनाच्या इतर मागासवर्गीय विभागाची अत्यंत महत्वाची योजना असून सन 2018-19 पासून राबविली जात आहे. इमाव व विजाभज प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्वेश होय. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सदर करण्याची अंतिम मूदत ही दिनांक 15 जून 2023 पर्यंत होती सदर अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2023 ठेवण्यात आलेली आहे.

सदर योजनेतर्गत महाराष्ट्रातील इमाव व विजाभज प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्ययावत जागतीक क्रमवारीच्या (Qs World University Ranking ) 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणा-या 50 विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. सदर परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक ते कागदपत्रासह,मा.संचालक,इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, 3 चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे – 411001 या पत्यावर सादर करावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर योजनेसाठी पात्र असणा-या विद्यार्थ्याना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडी साठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. डी. डी. डोके, संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच विजय साळवे, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण,(प्रादेशिक) विभाग नागपूर यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.