Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी करिता शेतकऱ्यांना eKYC सादर करण्याचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 19 ऑगस्ट :-  अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.

पालघर जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निर्देश देण्यात आले आहेत कि, शेतकऱ्यांनी PM KISAN ॲपद्वारे किंवा जवळच्या महा ई-सेवा केंद्रावरून eKYC तात्काळ करून घ्यावी.अन्यथा सदर योजनेचा पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही.सदर eKYC करतांना आधार क्रमांक व मोबाईल नंबर आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शॉटगन राष्ट्रीय स्पर्धेत ‘कांस्य पदक’ पटकावणाऱ्या अभिषेक पाटीलचा पालघर जिल्हापरिषदेमार्फत सत्कार

 

Comments are closed.