Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंढरपूर जवळ अपघातात 4 जण जागीच ठार

पंढरपूर-सांगोला मार्गावर खर्डीजवळ बोलोरो कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पंढरपूर 12 फेब्रुवारी:-  पंंढरपूरमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या 4 भाविकांवर पंढरपूर-सांगोला मार्गावर खर्डीजवळ बोलोरो कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना इतकी भीषण होती की यामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत चारही व्यक्ती कोल्हापूरमधील आहे. एक जण गंभीर जखमी आहे. 16 जण बोलोरे मधून प्रवास करत होते. थांबलेल्या ट्रक ला बोलेरो ने धडक दिली. कोल्हापूरच्या चंदगड याठिकाणचे ते रहिवासी असून ते पंढरपूर याठिकाणी दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली. मृतांमध्ये 1 पुरुष, 2 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या भीषण अपघातामध्ये मृतांच्या चेहऱ्याची दुर्दशा झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. मिळालेल्या आधार कार्डांच्या मदतीने त्यांची ओळख पटवली आहे.

Comments are closed.