आवळगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच भाष्करराव बानबले तर उप सरपंच देविदास उकरे यांची बहुमताने निवड
आवळगाव, दि. ११ फेब्रुवारी: मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणी प्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाष्करराव बानबले आपल्या आठ उमेदवारांसह विजय झाले आणि त्यातच त्यांचे ग्रामपंचायत आवळ गावचे सरपंच होण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसले. दिनांक ०८/०२/२०२१ ला सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत सरपंच म्हणून बहुमताने त्यांची निवड करण्यात आली. ते दुसऱ्यांदा ग्रामपंचायत आवळगाव चे सरपंच म्हणून पद भूषविणारे पोस्ट ग्रॅज्युएट पदवी धारण केलेले पदवीधर आहेत.
तर पहिल्यांदाच देविदास ऊकरे उपसरपंच म्हणून पद भूषविणारे ढीवर समाजाचे व या गावातील प्रथम मानकरी ठरलेले आहेत. सरपंच व उपसरपंच पदावर विराजमान झालेले दोन्ही व्यक्ती अत्यंत साधे, सरळ व मनमिळावू असल्यामुळे गावातील जनतेनी त्यांचे खूप खूप अभिनंदन केले. आणि आवळगावचा विकास हा महाराष्ट्रात नंबर 01 चा होईल अशी अपेक्षा गावकऱ्यांनी त्यांच्याकडून केली आहे. आदर्श गाव म्हणून असलेली ओळख कायम रहावी, विकासात्मक वाटचाल करावी यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.