Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनुराग कश्यप-तापसी पन्नू यांच्या घरातून आयकर विभागाने फोन-लॅपटॉप केला जप्त; 3 दिवस चालणार कारवाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, ४ फेब्रुवारी: बुधवारी आयकर विभागाने काही चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकं आणि कंपन्यांविरोधात कारवाई केली आहे. ज्यांच्या विरोधात कारवाई झाली, त्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप विकास बहल, विक्रमादित्य मोटवाने आणि मधु मंन्टेना आदी कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय फॅंटम फिल्म्स, टॅलेंट हंट कंपनी आणि एक्सीड कंपनीच्या विविध ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाने बुधवारी (3 मार्च) दिवसा सुरू केलेली छापेमारी रात्री उशिरापर्यंत सुरूचं होती. आयकर विभाग आज पुन्हा कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच ही कारवाई पुढील तीन दिवस सुरू राहू शकते, असंही म्हटलं आहे.

आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. ही कारवाई पुढील तीन दिवस चालू शकते. आयकर विभागाच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची चौकशी केली आहे. याशिवाय आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित मुंबईतील विविध कार्यालयांमध्ये शोध मोहीम राबविली आहे. या छापेमारी दरम्यान, आयकर विभागाच्या पथकांने विविध कागदपत्रं, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत. हे सर्व उपकरणं फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आली आहेत. पुढील शोध घेतला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मीडिया रिपोर्टनुसार, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांची पुण्यात चौकशी सुरू आहे. असंही म्हटलं जात आहे की, येथील कोणत्या तरी एका हॉटेलच्या खोलीत त्यांना ठेवण्यात आलं आहे. असं असलं तरी अद्याप याची पुष्टी करण्यात आली नाही. आयकर विभागाने बुधवारी सुमारे 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबई आणि पुण्यात बुधवारी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान छापेमारीला सुरुवात झाली होती. काल रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाचे अधिकारी या ठिकाणी ये जा करत होते.

या कारवाईबाबत आयकर विभागाचं म्हणणं आहे की, या सर्वांनी भरलेल्या आयकर रिटर्नमध्ये मोठी तफावत आढळली आहे. यामुळेच ही कारवाई केली असून कर नियमांमध्ये अफरातफर केल्याची शंका आयकर विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.