Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नरेला येथील प्लास्टिक कारखान्याला आग, दोघांचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

दिल्ली, 01 नोव्हेंबर :-  दिल्लीतील नरेला परिसरातील एका प्लास्टिक कारखान्यात भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून बचावकार्य सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. यावेळी इमारतीच्या काचा तोडून काही लोकांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून आतमध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नरेला येथील कारखान्यात कामगार काम करत असतांना ही आग लागली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आगीची घटना नरेला औद्योगिक परिसरात घडली. काही लोक जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थित असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.