पोलीस व नक्षल्यांत तीनदा वेगवेगळ्या ठिकाणी दोन तास चालली चकमक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २८ मार्च: कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंडा-हेटळकसा गावानजीक असलेल्या जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्याच मिळालेल्या महितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्फत खोब्रामेंडा-हेटळकसा जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवीन्यात आले. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक पोलिसांवर अत्याधुंद गोळीबार केला तर पोलिस जवानांनीही पहाडाच्या सभोवताल नक्षल्यांना जशाच तसे जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलीस जवान शोध मोहीम करीत असतांना नक्षल्यांनी पोलिसांना तीनदा वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष केले. त्यावेळी पोलीस जवानही नक्षल्यांना सडो कि पळो करून सोडले. जवळपास तीन ठिकाणी दोन तास चकमक उडाली असल्याची पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून घटने ठिकाणाहून नक्षली जंगलाचा फायदा घेत पळता पाय काढला असला तरी पोलीस नक्षल चकमकीत एक महिला नक्षल ठार झाल्याची शक्यता आहे. घटनेस्थळी सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र करून शोधले असता डेड बॉडी मिळाली नसली तरी चकमकी दरम्यान घटनास्थळी नक्षल्यांनी एक बंदुक, एमीनेषण आणि ३ आयडी बॉम्ब व इतर साहित्य पोलीस जवानांना जप्त करण्यात मोठे यश आल्याचे अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले आहे.
Comments are closed.