ग शाळेत अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या मुख्याध्यापकाला गडचिरोली पोलीसांनी घातल्या बेड्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कामेट्टा येथील मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासली..
लोकसपर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्हयात भामरागड तालुक्यात मौजा कुक्कामेट्टा इथल्या प्राथमिक शाळेत मागील काही दिवसांपासून शाळेतल्या अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य घडत असल्याची घटना समोर आली. पालकांच्या समजदारी आणि बालिकांच्या वागण्यामध्ये दिसून आलेले बदल आणि भिती मुळे ही घटना समोर आली.
गेल्या काही दिवसांपासून एका कुटुंबांतल्या दोन मुली बालिका शाळेत जायला घाबरत होत्या. हे पालकांच्या लक्षात येताच त्यानी आपल्या मुलींची विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे हे त्यांना वेगवेगळया करणारे शाळेत त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असल्याचे मुलींनी सांगितलं. तसंच याबाबत कोणाला सांगीतल्यास मुलींना शाळेतून काढण्याची धमकी देत, असं त्यांनी सांगितलं.
पालकांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, शाळेतल्या इतर विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी संवाद करून मुलींची चौकशी केल्यास, मुख्याध्यापक गव्हारे यांनी इतर मुलींसोबतही अश्लील कृत्य केल्याचं समोर आलं.
याबाबत पालकांनी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाया उप-पोस्टे लाहेरी इथं 5 मार्च रोजी जाऊन मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत, त्यांना अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. तर अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्रांमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील राहील, असं आश्वासन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलं आहे
Comments are closed.