Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

राजकीय षडयंत्रातूनच खंडणीचा गुन्हा दाखल; गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क 05 जानेवारी:- भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात ५ लाखांच्या खंडणी प्रकरणी महाजन यांच्यासह २८ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  पुण्यातील कोथरुढ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मराठी विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकांचे अपहरण करुन त्यांना चाकूचा धाक दाखवून राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचबरोबर ५ लाखांच्या खंडणीप्रकरणी महाजन यांच्यासह २८ जणांविरोधात पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मविप्र वादात भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी निंभोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला होता.

गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळले

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माझ्याविरोधात पुण्यात दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग असून त्याचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे, असं सांगतानाच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.

Comments are closed.