धक्कादायक! बालसुधारगृहात महिलेनी केली आत्महत्या
- दोन मुलांनी आत्महत्या केल्याची घटनेची शाई वाळत न वाळत असतांनाच बालसुधारगृहात पुन्हा महिलेने केली आत्महत्या
- बुलढाणा बालसुधारगृहातील ही दुसरी घटना
बुलडाणा, दि. ५ जानेवारी:- ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात कोरोना संसर्गाचा उपचारासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या जिल्हा कारागृहात एका महिलेने आत्महत्या केली आहे. जिल्हा कारागृहाच्या बाजूलाच असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत कोरोनामुळे आधी चौदा दिवस आरोपींना या कोरोनाग्रस्त रुग्णांना तात्पुरते कारागृहात ठेवण्यात आले होते.
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या सिंहगड या इमारतीत तात्पुरते तुरुंग बनविण्यात आले होते. याच ठिकाणी महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला मात्र अधिक माहिती सांगण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. लवकरच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी येणार आहेत व पुढील तपास करून या महिलेने का आत्महत्या केली? हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
या अगोदरही दोन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच महिलेने आत्महत्या केल्याने मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेल आहे. सर्वांचे डोळे तपास यंत्रणेकडे लागले असून त्या घटनेची माहिती अहवालानंतरच प्राप्त होणार.
Comments are closed.