Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस निरीक्षक यांची धडक कारवाई, आठ जुगाऱ्याना केले जेरबंद

नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांची धडक कारवाई .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड 16 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यात जुगाऱ्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे . त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश मागील मासीक बैठकीत मा. श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधिक्षक नांदेड यांनी दिले होते. या आदेशानुसार पोलीस स्टेशन हदगांवचे पोनि जगन्नाथ गणपती पवार यांनी गोपनिय माहिती काढून कारवाई करण्याकरीता सोबत पोलीस अंमलदार यांना घेवून दिनांक १५/११/२०२२ रोजी हद्दीत जात असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की, पांडुरंग शिंदे यांचे ढाब्याचे पाठीमागे मोकळया जागेत काही लोक गोलाकर बसुन झन्ना मन्ना नावाचा जुगार पत्यावर पैसे लावुन खेळत व खेळवीत असल्यांची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा मारला असता तेथे आठ जुगारी मिळुन आले. त्याचेकडून १९, ६००/- रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

सदर छापा कारवाईत पोनि पवार यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्यावरून पोस्टे हदगांव गुरन ३२२ / २०२२ कलम १२ (अ) म.जु.का कायदा प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / २३४२ विश्वनाथ हंबर्डे यांचेकडे दिला. सदर कारवाई छाप्यात स्वतः पोलीस निरीक्षक व पोहेकॉ नरवाडे, विश्वनाथ हंबर्ड, पोकॉ सतीश केंद्रे, जेठण पांचाळ, होमगार्ड गणेश गिरवीडे यांचा सहभाग होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदरची कारवाई मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड मा. श्री. धरने खंडेराय, अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्रीमती शफाकत आमना सहा. पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.