Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बनावट देशी मद्यसाठा जप्त

नांदेड उत्पादन शुल्क खात्याची मोठी कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड 16 नोव्हेंबर :- अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत मद्यसाठ्या संदर्भात एकाच दिवशी दोन कारवाई करण्यात आल्या. श्री.कांतिलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई, श्री. सुनिल चव्हाण संचालक (अंवद)।राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई, तसेच . श्री. प्रदिप पवार विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शनानुसार श्री. अतुल कानडे अधीक्षक रा.उ.शु. नांदेड यांचे प्रत्यक्ष उपस्थिती व नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नमस्कार चौक ते माळटेकडी ऊड्डाणपूल या रोडवर नांदेड येथे चार चाकी वाहनाने बनावट देशी विदेशी मद्य वाहतूकीची खात्रीलायक बातमी मिळाल्यामुळे दि. 14-11-2022 रोजी 14.40 वाजता श्री. अतुल अ. कानडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांचे प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क किनवट-ब विभाग व यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून एक अशोक लेलँड कंपनी निर्मित दोस्त स्ट्रॉग पिकअप चार चाकी वाहन क्र. MH12-SX-0655 व 60 बॉक्स बनावट देशी मद्य (भिंगरी संत्रा) व दोन अँन्ड्रॉईड मोबाईल जप्त करून आरोपी भागीरथसिंह दयालसिंह सोडा, रा. धोलिया राजस्थान, प्रीतेश गोविंद वाडेकर रा. नांदेड यांना अटक केली.

नंतर तपासात आरोपीस विचारणा केली असता आरोपीने सांगितल्या प्रमाणे बीड जिल्ह्यातील नवगण राजूरी येथील शेतामध्ये जाऊन गुन्ह्याकामी छापा मारला असता तिथे बनावट मद्य बाटलीत भरण्याकरिता वापरण्यात आलेली मशीन, बनावट मद्य भरलेल्या बाटल्याचे बुच (कॅप) सिलबंद करण्याकरीता वापरण्यात आलेली मशीन, 90 मी. लि. क्षमतेच्या 350 रिकाम्या बाटल्या, बनावट देशी मद्याचे रिकामे कागदी खोके (कार्टून्स), दोन अँन्ड्रॉईड मोबाईल व इतर साहित्याचा मुद्देमाल मिळून आला. व आकाश श्याम जाधव रा. बीड, विजेश कुमार भुराराम सैनी रा.चौकरी ता.खंडेला जि.सीकर. (राजस्थान) ह.मु.बीड , गोविंद राजेंद्र शर्मा रा. धोलिया ता. लाडणू जि. नागौर।(राजस्थान) ह.मु.बीड यांना अटक करण्यात आली असून बनावट देशी मद्य (भिंगरी संत्रा) व मद्य निर्मिती करण्याकरिता लागणारे साहित्य पुरविणारा आरोपी आसिफ रमजान तांबोळी रा. जावई वाडी ता. इंदापुर जि. पुणे हा आरोपी फरार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर दोन्ही ठिकाणहून १ चार चाकी वाहन व बनावट देशी मद्य (भिंगरी संत्रा) व मद्य निर्मिती करण्या करिता लागणारे साहित्य, मशीन व इतर असा एकुण रु 7,64,450/- इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून 1 आरोपी फरार आहे. त्यांचा शोध चालु आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.