Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनाच्या भीतीने मुलं आणि ग्रामस्थांनी पाठ फिरवल्यानंतर पोलीस, पत्रकार आणि रुग्णवाहिकेच्या पायलटने मृतावर केले अंत्यसंस्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

०रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. १ मे: कोरोनाग्रस्तांचा तिरस्कार केल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना कोणीही येत नाही अशा ठिकाणी शासकिय यंत्रणा मदतीला धाऊन येत आहेत.  अशीच मन हेलावुन टाकणारी घटना काला रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

म्हसळा तालुक्यातील केलटे बौधवाडी येथे एका ७६ वर्षांच्या वृद्धाचा अचानक राहत्या घरी मृत्यु झाला.  सदर वृद्धाच्या मृत्यनंतर त्याच्या मुलांनी आणि ग्रामस्थांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला.  सदर घटना समजताच तहसीलदार शरद गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभागाचे मंडळ अधिकारी दत्ता कर्चे, पत्रकार निकेश कोकचा, पोलीस हवालदार संतोष जाधव, पोलीस नाईक सुर्यकांत जाधव, पोलिस हवालदार कदम, १०८ रुग्णवाहिकेचे पायलेट शरद नांदगावकर आणि भरत चव्हाण यांनी अंत्यसंस्कार केले. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.