Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उसगाव येथे १०० बेडच्या श्रमजीवी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन व लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

एकलव्य गुरुकुल शाळेचे कोविड सेंटर मध्ये रूपांतर

या महामारीला समूळ नष्ट करून, अशी कोविड सेंटर बंद करण्याची वेळ यावी – विवेक पंडित

श्रमजीवी संघटना व विवेक भाऊंचे कार्य पथदर्शी – देवेंद्र फडणवीस

उसगाव/वसई दि.१ मे : कोविड महामारीच्या लढाईत जे फ्रंट वॉरियर्स आहेत अशा आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि पोलिस यांच्या प्रतिनिधींच्या हस्ते आज उसगाव येथे श्रमजीवी कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.

या सेंटर चे उदघाटन उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार उज्वला भगत, गटविकास अधिकारी भरत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. उसगाव डोंगरी येथील विधायक संसद या संस्थेच्या एकलव्य गुरुकुल या शाळेचे १०० बेड च्या कोविड केअर सेंटर मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर, खासदार श्री राजेन्द्र गावित, आमदार मनिषताई चौधरी, आमदार प्रसाद लाड, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक, तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती चे अध्यक्ष श्री विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित, संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, डॉ.नितीन थोरवे,
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब जाधव, यांच्यासह आरोग्य व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सध्या ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर असून प्रशासन व आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेऊन, या राष्ट्रिय संकटात प्रशासनाला मदत करण्यासाठी व कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतील अशा रुग्णांनी या ठिकाणी यावे आणि टेस्ट करून जर पॉझीटीव्ह असल्यास येथे दाखल व्हावे आणि उपचार घेऊन बरे व्हावे आणि आपल्यापासून इतरांना कोरोनाची बाधा होण्यापासून रोखा असे आवाहन श्री विवेक पंडित यांनी केले. तसेच या महामारीचे उच्चाटन होऊन आज सुरू झालेले हे कोविड केअर सेंटर लवकरात लवकर बंद करण्याची वेळ येऊ दे अशी प्रार्थना करूया असे आवाहन देखील त्यांनी केले.

तर, विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी
श्रमजीवी संगठणे तर्फे उभारण्यात आलेले हे कोविड सेंटर हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे सांगत, आदिवासी भागातील अश्या प्रकारच्या कोविड केअर सेंटर ची आवश्यकता आहे असे म्हटले. तसेच श्री विवेक भाऊ आणि श्रमजीवी संघटना नेहमीच गरीब ,व आदिवासींच्या प्रश्नांवर सरकार विरोधात रस्त्यावर आले आहेत, त्यावेळी समोर आपला मित्र आहे की कोण याचा त्यांनी कधी विचार केला नाही. परंतु केवळ विरोधासाठी विरोध न करता एखाद्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी सरकारला सहकार्य देखील करण्याची त्यांची जी भूमिका आहे ती खरोखरच प्रशंसनीय आणि पथदर्शी – देवेंद्र आहे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी श्रमजीवीच्या कार्याने प्रभावित होऊन या कोविड सेंटरला २५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर पुरवणार असल्याचे सांगितले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांनी देखील श्रमजीवी कोविड केअर सेंटर उभारून खूप मोलाचे कार्य केल्याचे सांगत श्रमजीवी संघटना आणि विधायक संसद च्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या सेंटरच्या सर्व कोविड डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

आजच्या कर्यक्रासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, कार्याध्यक्ष स्नेहा दुबे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, अशोक सापटे, नवीन दुबे, डॉ. आशिष भोसले, रोहन गायकवाड, प्रा. दिनेश काटले ,डॉ.हेमंत सवरा, डॉ.समीर खिस्मतराव, यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व स्वयंसेवक शारीरिक अंतर पळून उपस्थित होते. तसेच या लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.