Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घाणपाण्यामुळे वनवसाहतीतील परिवारांचे आरोग्य धोक्यात

वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देण्याची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. १२ मे : आलापल्ली वन विभाग वनाने व्याप्त असून या ठिकाणी आलापल्ली शहराला वन ग्राम म्हणून ओळख आहे. या वन विभागात आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या तीनही विभागाचे आलापल्ली शहरात वनविभागाची मोठी वसाहत आहे. या ठिकाणी आलापल्ली, भामरागडचे विभागीय कार्यालय आहे. तसेच सिरोंचा विभागा अंतर्गत येणारे प्रकाष्ट निष्कासन घटक याच ठिकाणी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत आहे. आलापल्ली चे वैभव समजल्या जाणाऱ्या या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचारी लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे.

forest colony

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली येथील गोल कॉलोनीच्या मागे असलेल्या सेप्टिक टॅंक फुटून त्याचे घाण पाणी पसरले असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असतांना दिवसेंदिवस जिल्हात कोरोनाबाधितांची संख्या व त्यामुळे मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच वनविभागाचे मात्र आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. या ठिकाणी डुकरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस झाला आहे. त्या माध्यमातून रोगांचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

forest colony

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या ठिकाणी घाण पाणी इतरत्र पसरल्यामुळे परिसरात निवास करणाऱ्या कर्मचारीवर्ग व त्यांच्या  परिवाराला साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी नाली नसल्यामुळे पावसाळ्यात संडासाचे घाण पाणी कर्मचारी लोकांच्या आंगणात येते. त्यामुळे चिखलासोबत दुर्गंधीचाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा परिवारातील मुलांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे या ठिकाणी सेप्टिक टॅंकची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. तसेच नालीचे बांधकाम करून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी वसाहतीत राहणाऱ्या कर्मचारी वर्गाकडून होत आहे.

हे देखील वाचा : 

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

चक्क… मोबाईल टॉवर वर चढून केला आत्महत्येचा प्रयत्न

 

Comments are closed.