प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम निर्मिती मंडळावर नियुक्ती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली ३ नोव्हेंबर :- दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची निवड मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासकम मंडळात सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. इंग्रजी अभ्यास मंडळाच्या नविन अभ्यासकमाच्या निर्मिती व आराखडा निर्माण समितीत प्राचार्य डॉ. मुनघाटे सहभागी होणार आहेत.
प्राचार्य मुनघाटे हे गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट एकेडेमिक कौन्सील, मैनेजमेंट कौन्सील यासारख्या व इतर प्राधिकरणावर कार्यरत आहेत. या आधी सुध्दा नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेले आहे. यूनेस्को,युनेस्कोतर्फे थायलंडमधील बँकाक येथे २३ व २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.आशिया पॅसिफिक विभागातील १० देशांमधील सुमारे ६० शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात भारतातील तीन जणांचा समावेश असून, राजाभाऊ मुनघाटे हे त्यापैकी एक आहेत. एशिया पैसेफिक क्वॉलिटी नेटवर्क यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रसिध्द संस्थेशी निगडीत असून अनेक आतरराष्ट्रीय संमेलनात सहभागी होऊन त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केलेले आहेत.
आतापर्यंत डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून, त्यांनी विविध शैक्षणिक परिषदांमध्येही सहभागी होऊन आपले योगदान दिले आहे. मुंबई विद्यापीठासारख्या देशातील नामवंत विद्यापीठाच्या अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सदस्य म्हणून प्राचार्य मुनघाटे यांना मिळालेल्या संधीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
Comments are closed.