Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गर्भवती महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात प्रसुती, अर्भकाचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

यवतमाळ, २० ऑगस्ट :-  यवतमाळ मध्ये एका गर्भवती महिलेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीही हजर नसल्याने उपचार झाले नाही. त्यामुळे तिची व्हरांड्यातच प्रसूती झाली आणि त्यात नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा हाकणाऱ्या महाराष्ट्रातील ही संतापजनक घटना आहे.

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडुळ इथल्या पीएचसीमधील या बेधुंद कारभाराने आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शुभांगी हाफसे ही गर्भवती महिला प्रसूतीसाठी आपल्या माहेरी विडुळ येथे आली होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिच्या वडिलांनी १०८ रुग्णसेवा वाहिकेला फोन केला होता. मात्र २ तास वेळ लागत असल्याने त्यांनी ऑटोद्वारे पीएचसी आरोग्य केंद्र गाठले. परंतु पीएचसीत वैद्यकीय अधिकारी वा कुणीही कर्मचारी हजर नसल्याने गर्भवती महिला प्रवेशद्वाराजवळील व्हरांड्यात थांबली. यावेळी असह्य प्रसवकळा होऊन तिथेच तिची प्रसूती झाली. त्यामुळे नवजात बाळाचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली जन्मदात्या आईची हत्या..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.