Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 56 उमेदवारांची प्राथमिक निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर, आणि जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 56 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार, अध्यक्षस्थानी जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्य, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी आमदार  जोरगेवार यांनी, चंद्रपूर जिल्हा उद्योग हब बनणार असून जिल्हयात विविध कंपन्या येणार आहे. यातून कुशल, अकुशल रोजगार निमार्ण होईल. तरी उमेदवारंनी अधिकाधिक अनुभव प्राप्त करून नोकरी करावी व कोणतेही काम करताना न्यूनगंड बाळगू नये, असा सल्ला दिला.

अमोल गायकवाड म्हणाले, उमेदवारांनी छोटे छोटे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स करावे व त्यातून उद्योजक बनावे. उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी, सदर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील कंपन्यामध्ये रुजू व्हावे. मिळेल ते काम करावे, अनुभव प्राप्त करावा व कामाच्या नवनवीन संधी शोधाव्यात. तसेच आपल्या कुटंबाचा उदरनिर्वाह करावा, असे सांगितले. यावेळी ऋतुराज सुर्य यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनेची माहिती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर रोजगार मेळाव्यात विदर्भ क्लिक वन सोल्यूशन चंद्रपूर, डिस्कॉन प्रा. लि. नागपूर, संसूर सृष्टी इंडिया प्रा.लि. चंद्रपूर, वैभव इंटरप्रायझेस, नागपूर, एल.आय.सी. ऑफ इंडिया, उत्कर्ष स्माल फायनन्स बॅक, नागपूर टाटा ट्रस्ट प्रा. लि. नागपूर आदी नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात 173 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी 56 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले. इतर सर्व अधिकारी -कर्मचारी यांच्या सहकार्याने रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.

Comments are closed.