Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिम जमातीच्या शेतकऱ्यांच्या विकासाला चालना

सोनचाफा लागवडीसाठी अर्थसहाय्य.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जव्हार 25 ऑगस्ट :-  जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  जिल्हा पालघर अंतर्गत आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमा अंतर्गत आदिम जमातीच्या शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी सोनचाफा लागवड करण्यासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत ४५ लाभार्थींची निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्फत प्रकल्प कार्यालय जव्हार येथे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच निवड झालेल्या लाभार्थींना कृषी विज्ञान बारामती येथील तांत्रिक अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना सोनचाफा लागवड करण्यासाठी शेतात खड्डे खोदणे याबाबत  तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर लागवडीसाठी शेतकऱ्यांना सोनचाफाची रोपे वाटप करण्यात आली.
ह्या कार्यक्रम प्रसंगी जव्हार प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह (भा.प्र.से), सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय मोरे, विषय विशेषज्ञ मिंलींद जोशी, कार्यालय अधीक्षक रोहिदास तावडे, कनिष्ठ लिपिक संजय कांगणे, गुरूनाथ वाघ, रामेश्वर आमझरे, सिताराम सवरा व शेतकरी मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.