Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुरवळा ग्रामपंचायतीवर फडकला शेकापचा लाल बावटा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २२ जानेवारी: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत गडचिरोली तालुक्यातील गुरवळा ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर सात पैकी सहा उमेदवारांनी विजयी बाजी मारत शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकावला. यासोबतच पुलखल, बोदली, आरमोरी तालुक्यातील मोहझरी, देलनवाडी, धानोरा तालुक्यातील हेटी, चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली, सगणापूर, फराडा, बोरी लखमापूर, हळदी या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विजयी उमेदवारांमध्ये गुरवळाचे चंद्रकांत भोयर, दर्शना भोपये, छायाताई बांबोळे, विलास अडेंगवार,जयाताई मंटकवार, प्रकाश बांबोळे,पुलखलचे तुकाराम गेडाम, सावित्रीबाई गेडाम,बोदलीमध्ये विठ्ठल पिपरे, सुनिता पिपरे, इंदिरा नैताम, सुनिता चिळंगे मोहझरीचे शैला लोनबले, राजेंद्र टेंभुर्णे, श्रीरंग कुमरे, वच्छला मडावी, मनिषा कुमरे, देलनवाडी ग्रामपंचायत च्या प्रिया कुमरे, हेटी ग्रामपंचायत मध्ये पुरोगामी युवक संघटनेचे खजिनदार भाई मुर्लिधर तुलावी फराडाचे हर्षणा मडावी, सगणापूरमध्ये धनराज सेलोटे, उज्वला भाकरे या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक उमेदवार निवडून आले आहेत.

सर्व विजयी उमेदवारांचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे महिला नेत्या जयश्रीताई वेळदा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर,विजया मेश्राम, ॲड.कबीर कालीदास, योगेश चापले यांनी अभिनंदन केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.