राजूजी कन्नमवार यांचे कोरोनाने दुख:द निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली , दि. २२ एप्रिल: येथील भामरागड वन विभागात कार्यरत असलेले वनकर्मचारी श्री. राजूजी कन्नमवार (५७) यांना कोरोनाचे लागण झाल्याने अहेरी वरून उपचाराकरिता सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होते. त्याच उपचारादरम्यान दि. २१ एप्रिल रोजी रात्री ११.०० च्या सुमारास राजूजी कन्नमवार यांची प्राणज्योत मालवली.
राजू कन्नमवार हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते. कुठल्याही सुखा-दुख:त हिरीहिरीने सहभाग नोंदवीत होते. त्यांना कुठल्याही कार्यक्रमात स्वंयपाका पासून तर सजावट करण्याची मोठी आवड होती. आलापल्ली शहरात आणि वन वसाहत मध्ये कार्यक्रमात स्वयंपाक आणि सजावटीसाठी पहिले नाव राजूजी कन्नमवार यांच असायचं. वन विभागात कर्तव्यावर असतांना आल्लापल्ली, सिरोंचा, भामरागड या तीनही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर सामान्याच्या परिवारापर्यंत त्यांच्या स्वंयपाकात नाव समोर असायचे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव शिस्तप्रिय असल्याने त्यांची ओळख समाजात चांगली होती. याशिवाय माजी मंत्री स्व. दादासाहेब कन्नमवार यांच्या परिवारातील वारसा आहेत.
राजूजी कन्नमवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुल आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यापैकी मोठा मुलगा अरूप कन्नमवार गडचिरोली वनपरिक्षेत्रामध्ये वनपाल या पदावर कार्यरत आहे. कोरोनाच्या संसर्गाने अचानक निधन झाल्याने त्यांच्या परिवारासह अल्लापल्ली शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
Comments are closed.