Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्यांना सोडले समुद्रात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदुर्ग, दि. २२ मार्च: सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले वायंगणी येथील समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संरक्षित केलेल्या अंड्यातून सुमारे १४९ कासवांची पिल्ले आज सकाळी वायंगणी येथील समुद्र किनारी समुद्रात नैसर्गिक अधिवासात वन विभाग, महसूल विभाग, प्राणी मित्र पर्यटक व कासव मित्र सुहास तोरसकर यांनी सोडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


सुमारे २०० ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी संरक्षित केली होती. तीस दिवसांनी या अंडयातून पिल्ले बाहेर आली. त्याची पहाणी वनविभागाचे अधिकारी विष्णू नरळे, सावळा कांबळे, उपजिल्हाधिकारी वर्षा शिगण, न्यायाधीश विनायक पाटील, तहसीलदार प्रवीण लोकरे यानी केली व ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांची माहिती घेतली, कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी वनविभागाच्या सल्ल्याने कासवांची अंडी दोन ठिकाणी समुद्र किनारी वाळूमय भागात संरक्षित केली होती त्यातील १४९ कासवांची पिल्ले बाहेर आली व त्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात समुद्रात सोडण्यात आले.

Comments are closed.