Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाला स्वतंत्र इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 23 जानेवारी : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय महिला विद्यापीठ आहे. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणे, अर्थसहाय्य करणे, विकसीत स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे, विकसीत स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविणे इत्यादी करिता हे इन्क्यूबेशन सेंटर काम करेल. या उपक्रमाने महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल व देशात महाराष्ट्र एक उदाहरण प्रस्तापित करेल, असा विश्वास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये नुकताच स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे मंत्री नवाब मलिक म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.