Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटीमध्ये ऑन ड्यूटी रिल्स बनविणाऱ्या कळंबच्या रिल्स स्टार लेडी कंडक्टर निलंबित

निलंबित लेडी कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

उस्मानाबाद 4 ऑक्टोबर :-  स्वतःचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणं उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील एका लेडी कंडक्टरला चांगलंच महागात पडलंय. मंगल गिरी अस या एसटी कंडक्टरचे नाव असून एसटी महामंडळाची प्रतिमा मालिन केल्याचा ठपका ठेवत या रिल्स स्टार कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. या कंडक्टर महिलेचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात.या व्हिडिओ ने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे आणि आशा व्हिडिओ मूळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांना निलंबित करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.