Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेट्रोच्या साईडवर मजुराचा पडून मृत्यू .

मीरा- भाईंदर मधील दुर्दैवी घटना .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मीरा- भाईंदर, 04,ऑक्टोबर :-  मुंबई सह ठाणे,नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरात मेट्रोचे जोरदार काम सुरू आहे. मेट्रोच्या व्यवस्थापनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने मीरा- भाईंदर परिसरात देखील मेट्रो चे काम वेगवान पद्धतीने सुरू आहे.

अशाच एका मीरा-भाईंदर येथील एका साईटवर एका मजुरांचा सिमेंटच्या पिलरवरून घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ही घटना घडली आहे. तो २ ते ३, मीटर वर काम करत होता. काम करत असतानाच सिमेंटच्या पिलरवरून तो घसरून पडला असे त्याच्या सोबत काम करणाऱ्या दुसऱ्या मजुराने सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोहन मुसाक असे मृत्युमुखी पडलेल्या मजुरांचे नाव असून तो झारखंड राज्याचा रहिवासी आहे. मीरा-भाईंदर शहरातील मनी पॅलेस हॉटेल जवळील साईटवर ही घटना घडली आहे. घटना घडल्यावर कंपनीच्या मॅनेजरने दुपारी दीड च्या दरम्याने मृताच्या नातेवाईकांना संपर्क केला. असे मृतकाच्या नातेवाईकांनी सांगितले. त्या मजुरांचे पार्थिव त्याच्या गावी नेण्यात येणार असून मृतकाच्या नातेवाईकांना संपूर्ण आर्थिक मदत कंपनी करणार असल्याचे मॅनेजरने मृतकाच्या नातेवाईकाना सांगितले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चामोर्शी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरी..

Comments are closed.