Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चामोर्शी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चामोर्शी, ४, ऑक्टोबर :- वनपरीक्षेत्र अधिकारी गडचिरोली (सामाजिक वनिकरण) यांच्या वतीने दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन चामोर्शी वनपरिक्षेत्र अधित आर. बी. इनवते यांचे हस्ते संपन्न झाला. या जनजागृती रॅलीमधे जिल्हा परिषद केंद्रशाळा व हायस्कूल चामोर्शीचे विद्यार्थी, चामोर्शी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी व सामाजिक वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी ट्रॅक्टर व जीपमध्ये वन्यप्राण्यांचा व जंगलाचा देखावा तयार करण्यात आला होता तसेच शाळेतील मुलांनी विविध वन्यप्राण्यांचे वेष धारण केले होते..

पृथ्वीवरील जैवविविधता अफाट असून यावरील सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक प्राणी, पक्षी, कीटक इ. चे अन्न साखळीमधे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच अगदी लहान फुलपाखरापासून ते मोठ्या हत्ती पर्यंत आणि अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या वाघाचेही तितकेच महत्त्व आहे. सबब या वन्यप्राण्यांविषयी जनसामान्यांना ओळख होऊन त्यांचे संवर्धनासाठी दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर रोजी वनविभागामार्फत जनजागृती करण्यात येते..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आल्लापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक तौलिया व सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी मनोज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जि. प. हायस्कूलचे प्राचार्य अविनाश तालापल्लीवार, शिक्षक. हर्षा रंदये, हिनालता मंडल, जगदीश देशमुख व पियुष आकेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रभात फेरीत सर्व सहभागी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना वन्यजीवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक वनिकरण परीक्षेत्र गडचिरोलीचे वनरक्षक विवेक अलोणे, वनपाल संतोष देगावे यांनी केले. त्यांना चामोर्शी वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची मदत केली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सामाजिक तसेच प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व वनमजूर यांनी प्रयत्न केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

डॉ.आमटे दाम्पत्याची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी घेतले भेट.

Comments are closed.