Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बतावणी करुन पैशांची बॅग चोरी करणारे सराईत आरोपी गजाआड .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 04,ऑक्टोबर :- बतावणी करून पैशाच्या बॅगेची चोरी करण्याऱ्या इसमाला अटक करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २३/०९/ २०२२ रोजी दुपारी ०३.०५ वा. चे सुमारास
तक्रारदार हे त्यांचे एव्हरशाईन सिटी, वसई (पु.), येथील एच.डी.एफ.सी. बँकेतुन पैसे काढुन घेवुन जात असतांना अनोळखी आरोपीनी त्यांचा पाठलाग करत तक्रारदार हे त्यांचे अक्टीव्हा मोटर सायकलवरुन वसई फाटा ब्रिजचे उतरणी जवळील सुलभ शौचालयाच्या जवळ येथे आले असता त्यांना एका मोटार सायकल वरील अनोळखी इसमाने तुमचे पैसे पडले आहेत असे सांगितले. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांची अक्टीव्हा रोडचे कडेला उभी करुन पडलेले पैसे उचलण्यासाठी गेले असता दुस-या मोटार सायकलवरील अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे अक्टीव्हा मोटर सायकलचे डिक्कीतील रोख रक्कम ३,००,०००/- रुपये चोरी करुन घेवुन गेले होते. सदरबाबत फिर्यादी – बिपीन ईश्वरलाल पांचाळ, वय – ४८ वर्षे, धंदा – फॅब्रीकेशन, रा. चितळसर, मानपाडा, घोडबंदर रोड, ता. जि. ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीवर पेल्हार पो. स्टे. गु. रजि. नं. ८१३ / २०२२ भा.दं.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे दिनांक २३/०९/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व
मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन घटना तांत्रीक पुरावे हस्तगत केले. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेवून आरोपी कुनचला चिन्ना बाबु, किशोर गुड्डेट्टी व्यंगटया, दोन्ही रा. थिप्पा कॉलणी, पोस्ट दामावरम, बोगोले, ता. कवेरी, पोलीस ठाणा- कपराला टिप्पा जि. नेल्लोरे, राज्य आंध्रप्रदेश यांना दि.२८/०९/२०२२ रोजी ताब्यात घेवून नमुद गुन्हयात अटक केली आहे. नमुद आरोपींचे चौकशी दरम्यान आरोपी – कुनचला चिन्ना बाबु याचे विरुध्द महाराष्ट्र राज्यात पुणे,अहमदनगर, भिवंडी, ठाणे, तसेच आंध्रप्रदेश व इतर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल असुन आरोपी गुन्हा करण्याकरीता अगोदर मोटार सायकलची चोरी करुन गुन्हा करत असतात. सदर आरोपी यांचेकडून गुन्हयातील रोख रक्कम – ८४, ५०० /- रुपये तसेच चोरी करण्या करीता वापरलेल्या दोन युनिकॉन मोटर सायकल असा एकुण- २,८५,२८० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा तानाजी चव्हाण हे करत आहेत. नमुद आरोपी यांचेकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस ठाणे पेल्हार ,आचोळे
नारपोली, ठाणे शहर, भोसरी, पुणे शहर याठिकाणी
गुन्हा रजि. नंबर, कायदा व कलम
८१३/२०२२,भा.दं.वि.सं.कलम-३७९,४२०,३४ प्रमाणे (मुळ
गु.रजि.नं.गुन्हा )गु.रजि.नं. ३५६/२०२२, भा.दं. वि. सं. कलम ३७९ प्रमाणे, गु.रजि. नं. ५५१/२०२२, भा.दं. वि.सं. कलम- ३७९ प्रमाणे
गु.रजि.नं. १३६/२०२२, भा.दं. वि. सं. कलम ३७९ प्रमाणे
सदरची कामगिरी प्रशांत वाघुंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, रामचंद्र देशमुख,सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि सनिल पाटील, पोहवा योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, पोना प्रताप पाचुंदे, पोअं संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चामोर्शी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरी..

डॉ.आमटे दाम्पत्याची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी घेतले भेट.

Comments are closed.