Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या सहाय्यकाला अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागात होणाऱ्या अनागोंदीचा केला पर्दाफाश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे, दि. ११ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा घेऊन ठाण्यातील महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील काही ‘ड’ कर्मचारी ही इंजेक्शन अवैधरित्या बाहेर विकत असल्याची खात्रीलायक माहीती सामाजिक कार्यकर्ते डॉ बिनू वर्गीस यांना मिळाल्यानंतर ठाणे पोलीसांच्या मदतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आणले. त्यामुळे ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं मुलुंडमधील पद्मश्री नर्सिंग होममधील एका डाॅक्टरचा सहाय्यक रेमडेसिवीर इंजेक्शन चारपट दर वाढवून विकत असल्याबाबत त्याच्या सहाय्यक अटक केली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हे रेमडेसिवीर इंजेक्शन सामान्य विक्रीसाठी नसून ते फक्त शासकीय विभागासाठीच वापरण्याचे होते. यामध्ये ठाणे महापालिकेचे काही अधिकारीही सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तीन हात नाका येथे सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.