Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके विजयी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 06 नोव्हेंबर :- अंधेरी येथील बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. आज रविवारी सकाळ 8 वाजता पासून अंधेरीत मतमोजणीला सुरूवात झाली होती. यात ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मत मिळाली आहे. यावेळी सर्व फेर्यांमध्ये लटके यांनी अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतली होती.

या विजयाबद्दल ऋतुजा लटके म्हणाल्या की, हा विजय माझा नाही तर माझे पती रमेश लटके यांचा आहे. माझ्या पतीने जे काम केले त्यालाच मतदारांनी आज प्रतिसाद दिला आहे. पतीच्या निधनानंतर निवडणूक लढवली याची मला खंत आहे. त्यामुळे या विजयाचा मी जल्लोष करणार नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विजया नंतर ऋतुजा लटके, शिवसेना नेते अनिल परब यांनी मातोश्रीवर जावून उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया दिली. यावेेळी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांचे रश्मी ठाकरे यांनी औक्षवण करून अभिनंदन केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.