सांगली जिल्ह्यात गाईने एकाच वेळी तीन वासरांना जन्म दिला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली –01-नोव्हेंबर :-
एकाच वेळेस गाईला तीन वासरे होण्याची आश्चर्यजनक घटना सांगलीतील वाळवा तालुक्यात येलूर येथे घडली. गाई किंवा म्हैस यांना एकच पिल्ल होत असते, हे सर्वाना ज्ञात असताना गाईला तीन वासरे होणे म्हणजे एक चमत्कारच म्हणावे लागेल. मात्र असा चमत्कार येलूर येथील शेतकरी चेतन पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाहायला मिळाला आहे.
चेतन धनाजी पाटील व संग्राम धनाजी पाटील हे दोन भाऊ आहेत। त्यांच्याकडे 25 गाई, 5 म्हैशी 1 वळू असा 31 जनावराचा येलूर येथे मुक्त गोठा आहे. त्या गोठ्यातील होस्टन जातीच्या गाईला शनिवारी सकाळी तीन वासरे झाल्याची खबर गावात पसरताच वासरे पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यामध्ये दोन पाडी व एक पाडा आहे. ही तिन्ही वासरे सदृढ आहेत तर सध्या वासरे पाहण्यासाठी गावातून व परिसरातून लोकांची गर्दी होत आहे.
Comments are closed.